Tuesday, July 30, 2019

लग्न जुळण्याआधी..........



     तो दिवस आला मी माझ्या मामेभावाच्या लग्नाला बाबांन सोबत जात होती. माझा पेहराव अगदी साधा चुडीदार ड्रेस, साधी वेणी, सिंपल टिकली, गळ्यात 1  लॉकेट, एका हातात बांगडी व एका हातात वॉच.
     आम्ही म्हणजे मी व बाबा बस मध्ये जाताना एका नातेवाईकाने बाबांना माझ्यासाठी एक स्थ्ळ सूचवले. मग आम्ही लग्नाच्या ठिकाणी गेलोत. माझा
स्वभाव तसा लाजाळू मी माझ्या  आईच्या सोबत सोबत राहात होती. मामेभावाच्या लग्नाचे सर्व कार्यक्रम आटोपल्या नंतर काही मोठमोठया मंडळींनी मिळून गोल राऊंड बनवले व मला त्या सर्वांन समारे बसतले. तेव्हा मला तेथील सर्वजन एक एक प्रश्न विचारु लागले. मी त्या सर्वांच्या प्रश्नांचे उत्तरे दिली. त्या लग्नात माझी होणारी सासूबाई होती. म्हणजे मला तेव्हा समजले की आरे !  हा तर मला (मुलगी) दाखवण्याचा कार्यक्रम सुरु आहे. मग मनात विविध प्रकारचे विचार सुरु होते. आपण तर खुप साध्या वेशभुषेत आहोत. साधा मेकअप सुद्धा केला नाही आणि त्या लग्नात माझ्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर मुली होत्या....

Emotions....

      माझ्या माहेर चे वातावरण सुद्धा खुप कडक, बाबांना जास्त्‍ा फॅन्सी ड्रेस घालणे, मेकअप करणे, फिरणे, वगैरे असे आवडायचे नाही. खुप भिवून, घाबरुन राहायची. मी आजपर्यंत ही तशीच आहे..... आजूनही बाबांना काही सांगायला घाबरचे... म्हणूनच मला माझे काही Emotions, माझे काही प्रश्न्‍ या जगाला विचारायचे आहेत......

नवीन नवरी

मुली लग्न्‍ा करुन आपल्या आई-वडिलांचे घर सर्व नातेवाईक, सर्व काही सोडून एका ओळख नसलेल्या मुलाच्या घरी म्हणजे सासरी येतात. तिची फक्त्‍ एकच अपेक्षा असते, की तिचा नवरा तिच्यावर प्रेम  करणारा असावा. तिची काळजी घ्यावी जेव्हा ती नवीन नवरी म्हणून आलेली असते.

     मी एक मिडल क्लास फॅमेली तील मुलगी आणि माझे एका मिडल क्लास फॅमेली तील मुलाशी लग्न्‍ा झाले. तो मुलगा माझ्या पेक्षा वयाने 9 वर्षाने  मोठा आहे. आमचे अरेंज मॅरेज आहे. मी राहणीमानाला खुप साधी सिंपल आहे. मी माझी Master Degree मुंबई सिटी तुन पूर्ण केली आहे. तरीही माझी जीवनशैली, राहणीमान अगदी साधी सिंपल. पण आत्ताच्या मुलांना फँसी ड्रेस घातलेल्या मॉडर्न मुली आवडतात. एका तालुका स्थरावरुन मुंबई सारख्या शहरात राहून सुध्दा माझे राहणीमान बदलले नाही......... हया मुलाने मला होकार दिला मला सुरवतीला खुप चांगले वाटले... पण काय माहीती होते त्या मागे दुसरे काही कारण  असू शकेल??????