तो दिवस आला मी माझ्या मामेभावाच्या लग्नाला बाबांन
सोबत जात होती. माझा पेहराव अगदी साधा चुडीदार ड्रेस, साधी वेणी, सिंपल टिकली, गळ्यात
1 लॉकेट, एका हातात बांगडी व एका हातात वॉच.
आम्ही म्हणजे मी व बाबा बस मध्ये जाताना एका नातेवाईकाने
बाबांना माझ्यासाठी एक स्थ्ळ सूचवले. मग आम्ही लग्नाच्या ठिकाणी गेलोत. माझा
स्वभाव तसा लाजाळू मी माझ्या आईच्या सोबत सोबत राहात होती. मामेभावाच्या लग्नाचे
सर्व कार्यक्रम आटोपल्या नंतर काही मोठमोठया मंडळींनी मिळून गोल राऊंड बनवले व मला
त्या सर्वांन समारे बसतले. तेव्हा मला तेथील सर्वजन एक एक प्रश्न विचारु लागले. मी
त्या सर्वांच्या प्रश्नांचे उत्तरे दिली. त्या लग्नात माझी होणारी सासूबाई होती. म्हणजे
मला तेव्हा समजले की आरे ! हा तर मला (मुलगी)
दाखवण्याचा कार्यक्रम सुरु आहे. मग मनात विविध प्रकारचे विचार सुरु होते. आपण तर खुप
साध्या वेशभुषेत आहोत. साधा मेकअप सुद्धा केला नाही आणि त्या लग्नात माझ्यापेक्षा कितीतरी
पटीने सुंदर मुली होत्या....
No comments:
Post a Comment