Wednesday, August 7, 2019

"अन्न हे परब्रम्ह"


         "अन्न हे परब्रम्ह " असे म्हणतात पण इथे मात्र वेगळेच. मागील वर्षात  असे कधीच झाले  नसेल कि आमच्या घरचे सकाळ असो वा संध्याकाळ असो जेवताना त्या अन्नाला काहीतरी नावबोट ठेवायचे म्हणजे ठेवायचे. "ती भाजी पानचटच झाली,खारटच झाली,मग तिखटच कमी झाले, मसाला कमी झाला,तेल जास्त झाले,भाजी जळाली". ती भाजी,चपात्या असो की मग नास्त्याचे असो त्याला नाव ठेवायचे म्हणजे ठेवायचे आणि प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या सर्वांकडेच असते असे आवडी निवडी.
        सकाळ उठल्यापासून मला टोकणे सूरु होत होते, त्यात प्रत्येकाची ऑर्डर वेगवेगळी असे आणि सर्वांची वेळ पण वेगवेगळी असत. "तु चहात साखरच टाकली नाही वाटते, तुझा चहा पानचट होते" असे ना ना तऱ्हेचे बोलणे मला रोज ऐकावे लागत असे. ह्या जगात परफेक्ट असे कुणीच नव्हते. नवीन नवीन असताना कधी कधी मग "तु आज हे बनव, मला आज ते खाव वाटत आहे"  मी घरचे जे म्हटले ते बनवून द्यायची पण त्यांचे बोलणेच असे असायचे कि भितीपाई माझे बिगडून जायचे. मला स्वयंपाकाची आवड आहे आणि वेगवेगळे पदार्थ बनवायला पण आवडते. आता मात्र ती आवड कमी केली. जसे एखाद्या गोष्टीसाठी कुणाला प्रोत्साहन केले तर समोरच्याला पुन्हा काही करण्यात आवड निर्माण होते पण इथे मात्र समोरच्याला बोलून बोलून मागे खेचले जाते. माझी कोंडी वाढतच जायची. सुरवातीला मी निमुटपणे सर्व सहन केले.

संसार संसार....


काही दिवसानंतर मला वाटायला लागले की कुठल्यातरी जेल मध्ये आली आहे. आम्ही एकत्र असून एकत्र नव्हतो. हे त्यांच्या नावाप्रमाणेच निरस आहेत. कुठल्याच गोष्टीत आवड नाही. फिरणे, मौज मज्जा हे त्यांच्या शब्दकोशात नव्हते. त्यांना ज्या गोष्टी मनात वाटायच्या तेच करायचे. एखदयाला काही आवडत नसतील तर आपण त्यांच्या आवड निर्माण करु शकतो. पण मी प्रयत्न केला तर त्यांना आवडत नसे. त्यांचा स्वभाव माझ्या पूर्ण विरुध्द आहे. तरी मी स्विकारून घेतला.
त्यांच्या बद्दल काही चांगल्या गोष्टीपण आहेत त्या म्हणजे त्यांची Teaching खुप छान आहे आणि ते खुप हुशार आहेत.. कुठलीही अडचण असो त्याचे solution त्यांच्याकडे तयार असते. Health बदृल त्यांना खुप माहीती आहे. मला वाटत होते माझ्या सर्व Problems चे solutions
त्यांच्याकडे मिळतील पण काही अडचणी अशा आहेत की त्याचे निराकरण अजून झाले नाही.
लग्नानंतर आम्ही बाहेर फिरायला गेलो ते पण त्यांच्या मावशीनी जायला सांगितले म्हणून. मला सगळ समजत होते वेगळेच वाटत होते. मनातून खूप खचून गेली होती. त्यांचा स्वभाव मला समजायला लागला होता. मला त्यांच्या वागण्याचा राग यायचा मग माझी चिडचिड वाढत होती. मग मी त्यांना बोलायची नाही आणि माझ्या ह्या स्वभावाला ते हेकड म्हणायचे. कस असतं ना “समोरच्यांनी कस वागलं तरी घरच्या सुनांनी चांगलच वागायला पाहिजे ” नाही तर ती मुलगी बरोबर नाही असे म्हटले जाते.
असाच आमचा संसार सुरु होता.

सासरी आल्या नंतर...


मी लग्न करुन सासरी तर आली पण मला तिथे करमतच नव्हते. सतत घरची आठवण येत होती. कारण माझे आण़ि त्यांचे(पतीचे) विचार जुळतच नव्हते. मला खुप एकटे एकटे वाटायचे तिथे. ते  माझ्या सोबत खुलुन बोलायचे नाही. नवीन घरी मला काय वाटत असेल, मला काय हव, काय नाही हे विचारायला त्यांना वेळ नसायचा. मला एकटेपणाची जाणीव खुप व्हायची.
नवीन नवीन असताना मला त्यांच्या वागण्याचा खूप त्रास झाला.‍ मला त्यांच्यासाठी माझ्या सर्व आवडी निवडी बदलाव्या लागल्या. ते जे म्हणतील तेच. मला खुप बंधन टाकत होते पण त्यांच्या दृष्टीने ते बंधन नव्हाते. मी सर्व गोष्टींचा स्विकार केला.
हळुहळू मला त्यांच्या स्वभावाबद्दल समजू लागले. मी तशी तशी बदतल होती. त्यांचा स्वभाव दिसायला अगदी सायलेंट दिसतो पण मला आज समजले ते सायलेंट नाही आहेत. अगदी जुन्या रुढी परंपरा धरुन चालणारे आहेत OLD Man सारखे अजूनही तसेच आहेत,त्यांना पाश्चिमात संस्कृती बिलकुल आवडत नाही. पण माझ्या अपेक्षा वेगळयाच होत्या.
मी ज्या घरातून आली(म्हणजे माहेरचे घर) त्या घरात आणि आत्ताच्या (म्हणजे सासरचे घर) घरात खुप फरक आहे. म्हणजे खाण-पिणे, राहणे सगळ वेगवेगळया पध्दती. सुरवातीला मला खुप त्रास झाला. प्रत्येकाची स्वयंपाक बनवण्याची पध्दत वेगळी असते माझ तसेच झाले सासरी सगळया पध्दती वेगळयाच त्यामुळे मला प्रत्येक गोष्ट विचाराव लागायची अश्या विचारण्या विचारण्याने घरच्यांना वाटत होते की मला स्वंयपाक जमत नाही. पण तसे काही नव्हते.

लग्नाचा दिवस


पाहता पाहता लग्नाचा दिवस आला. ठरलेल्या तारखेला लग्न झाले. खुप पाहुणे होते लग्नात अगदी आनंदात पार पडला आमचा लग्न सोहळा. मी सासरी आले काही दिवसांनी मला माहिती पडले कि, त्यांना मी पसंत नव्हती. “लग्न करायच का म्हणून त्यांनी माझ्यासोबत लग्न केले.” “खुप मुली पाहल्या, खुप वेळ निघून गेला, वय वाढत होते, कधी मुलींकडून जुळत नव्हते तर कधी कुंडल्या जुळत नव्हत्या.” त्यांनी माझ्या सोबत पसंत नसताना ही लग्न केले हे जेव्हा मला त्यांनी सांगितले तेव्हा मला खुप वाईट वाटले. माझा स्वभाव मुळातच खुप हळवा होता. माझ्या बाबांनी जरी मला रागावल तरी मला खुप रडायला यायच. मी मनाने खुप हळवी आहे आणि आजही आहे. तेव्हा मला काही सुचेनासे झाले होते. मला जेव्हा त्यांनी ह्या सत्याबद्दल सांगितले तेव्हा मला मजाक असे वाटले पण त्यांनी हे खरे असल्याचे सांगितले. हा धक्का तर मला बसलाच पण अजून एक सत्य माहिती पडले ते म्हणजे “ह्यांचे आधी एका मुलीसोबत साक्षगंध होऊन तुटले होते.” हि गोष्ट माझ्या बाबांना माहिती होती पण बाबांनी मला लग्नाआधी सांगितली नव्हती. हा दुसरा धक्का. म्हणून कंटाळून कदाचित त्यांनी माझ्यासोबत लग्न केले असावे असे वाटत होते.
मला त्यांनी(पती) ह्या गोष्टी स्पष्ट सांगितल्या. मग मी त्यांना विचारले “मग आता काय करायचे??” “आता आहे तसे निभवायचे.” समोरच्यांनी आपल्या सोबत चांगले केले नसेल तरी आपण समोरच्या सोबत चांगलेच वागायचे ह्या पद्धती प्रमाणे आपण राहायचे हेच ठरवले होते.. कारण तिथे संस्कार मधे यायचे.
     लग्नाच्या दोन-तिन दिवसातच अनपेक्षित असलेल्या गोष्टीचा उलगडा झाला. पण समोर तरी वेवस्थीत होईल असे वाटत होते... पण कसे होणार???

Monday, August 5, 2019

माझ्या मनातला गोंधळ.....


बरेच दिवस गेलेत तरीही आमचे(माझे व ह्यांचे) एकमेकांशी अजून  फोनवर बोलणे नव्हते. माझ्या मनात विचारांचा गोंधळ होत होता. अस्वस्थ्‍ा वाटत होते. बाबा त्या मुला बद्दल खुप चांगल्या गोष्टी सांगायचे ”मुल खुन चांगली आहेत, आईच्या बोलण्यासमारे जात नाहीत, आई जे म्हणेल तेच खरे अशी ती मुल आहेत.”  हे एैकून माझ्या मनात अजूनच गोंधळ होत होता.. “आईच्या धाका मुळे तर त्यांनी मला होकार दिला नसेल ना?”, “ऐवढे दिवस झाले तरी त्यांनी एक फोन सुध्दा नाही केला??”..  असे ना ना त-हेचे प्रश्न माझ्या  समोर उपस्थीत होत होते. मला त्यांना(मुलाला) बोलल्याशिवाय राहावतच नव्हते. लग्नाची तारीख जशी जशी जवळ येत होती तशी तशी बेचैन वाढत होती.
असे प्रश्न उपस्थित होत होते कि, त्यांनी त्यांच्या मना विरुद्धतर तर लग्न नाही करत आहेत??
ऐके दिवशी हिम्मत केली व त्यांना कॉल केला त्या दिवशी Republic Day होता. Wish करण्याच्या कारणाने  त्यांना फोन केला. तेव्हा त्यांना wish करुन सरळ एक प्रश्न विचारला “तुम्ही स्वत: होऊन फोन करणार नव्हते वाटते?” तर त्यांनी सरळ “ हो ” म्हटले व त्यावरुन अजून म्हटले, “लग्नापर्यंत तुझ्यासोबत फोन वर बोलायचे नाही असे ठरवले होत मी.” तेव्हा त्यांचे थोडे अश्चर्यच वाटले. आजकालचे  मुल कसे आणि हे तर त्यापेक्षा वेगळेच आहेत. मनात गोंधळ वाढत गेला. एक वेळ बोलणे झाले तेवढे समाधान वाटले मला. त्यानंतर दुसरी वेळ म्हणजे जेव्हा मी माझी PET(P.hd Entrance Test) exam पास झाली ह्याबद्दल त्यांना कळवले. जेव्हा कळवले तेव्हा त्यांना खुप आनंद झाला. त्यांनी त्यांच्या घरच्यांना व नातेवाईकांना पण सांगितले माझ्या PET result बद्दल. मला व माझ्या घरच्यांना पण खुप आनंद झाला पण माझ्या घरच्यांना PET result पेक्षा जास्त माझे लग्न जुळले याच्यातच झाले होते. मला माझे नशीब खुप बदलेल असे दिसत होते.
पण लग्नानंतर माहिती पडले त्या PET बद्दल कुणालाही काही वाटले नाही हे आज मला सामजले. साहजीच लग्ना आधी आम्ही फोन वर दोन ते तिन वेळ बोललो असेल.

Saturday, August 3, 2019

After Engagement.......


आमची Engagement होऊन काही दिवस झाले होते. मुलाकडच्यांनी माझा मोबाईल नंबर घेतला होता. मला माझ्या बहिणी,मैत्रिनी चिडवाच्या तुला मुलाचा फोन येत असेल ना?, तुम्ही फोन वर बोलत असशाल ना? अशा चिडवायच्या. त्यांचे चिडवणे साहजीक होते. कारण आताची ती फॅशनच झाली... आजची मुल होणाऱ्या बायकोला बोलण्यासाठी साक्षगंधातच मोबाईल गिफ्ट देतात. सर्वंनाच माहिती आहे आजच्या मुल-मुलींचे लग्नाच्या आधी बोलणे,फिरणे सुरु असते. हि गोष्ट आता कामन झाली आहे. पण इथे मात्र वेगळेच झाले.
 साक्षगंध होऊन 5-6 दिवस झाले नविन वर्षाच्या दिवशी बाबांच्या मोबाईल वर ह्यांचा फोन आला साक्षगंधा नंतर पहिला फोन अन ते पण बाबांच्या मोबाईल वर आम्हा सर्वांना वाटले नवीन वर्षाच्या शुभेच्छासाठी फोन केला असेल पण इथे मात्र वेगळेच झाले मुलाकडच्यांनी फोन केला कशासाठी तर “लग्नाची तारिख बदलण्यासाठी” किती विचित्र गोष्ट ना ? जेव्हा लग्नाची तारिख ठरवत होते तेव्हा सर्वांच्या सम्मतीनेच ठरली होती व मुहूर्त पाहूनच तारिख काढली, कार्यालय, डेकोरेशन वाले सर्व बुक केले आणि सर्व नातेवाईकांन पर्यंत लग्नाची तारिख माहिती झाली व साक्षगंध होऊन फक्त 5 - 6 दिवसच झालेच कि लग्नाची तारीख बदलण्यासाठी फोन केला होता. बाबांनी सांगितले हे अशक्य आहे कारण लग्नाच्या विधीच्या सर्व गोष्टी बुक झाल्या होत्या. मला थोडे वेगळेच वाटले... कारण  अस अपेक्षित नव्हते. 

Friday, August 2, 2019

Engagement..


मुलांकडच्या म्हणण्यानुसार सर्व पध्दतीने आमचे साक्षगंध झाले. सर्वांच्या  साक्षीने लग्नाची तारीख ठरवली. सर्व काही ठिक झाले. माझ्या बाबांनी मंगल कार्यालयापासून सर्व लोकांना अडव्हांस दिले होते. आईबाबांकडच्या सर्व नातेवाईकांनी साक्षगंधाच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. सर्वजण म्हणत होते खुप छान कार्यक्रम झाला. पण मुलांकडच्यांनी खोड काढला की “तुम्ही बफे ठेवायला पाहिजेत होते आजुन भटजी बरोबर नव्हते. लग्नात दुसरे भटजी ठेवा.” ठिक आहे हे पण एैकून घेतले...