Wednesday, August 7, 2019

लग्नाचा दिवस


पाहता पाहता लग्नाचा दिवस आला. ठरलेल्या तारखेला लग्न झाले. खुप पाहुणे होते लग्नात अगदी आनंदात पार पडला आमचा लग्न सोहळा. मी सासरी आले काही दिवसांनी मला माहिती पडले कि, त्यांना मी पसंत नव्हती. “लग्न करायच का म्हणून त्यांनी माझ्यासोबत लग्न केले.” “खुप मुली पाहल्या, खुप वेळ निघून गेला, वय वाढत होते, कधी मुलींकडून जुळत नव्हते तर कधी कुंडल्या जुळत नव्हत्या.” त्यांनी माझ्या सोबत पसंत नसताना ही लग्न केले हे जेव्हा मला त्यांनी सांगितले तेव्हा मला खुप वाईट वाटले. माझा स्वभाव मुळातच खुप हळवा होता. माझ्या बाबांनी जरी मला रागावल तरी मला खुप रडायला यायच. मी मनाने खुप हळवी आहे आणि आजही आहे. तेव्हा मला काही सुचेनासे झाले होते. मला जेव्हा त्यांनी ह्या सत्याबद्दल सांगितले तेव्हा मला मजाक असे वाटले पण त्यांनी हे खरे असल्याचे सांगितले. हा धक्का तर मला बसलाच पण अजून एक सत्य माहिती पडले ते म्हणजे “ह्यांचे आधी एका मुलीसोबत साक्षगंध होऊन तुटले होते.” हि गोष्ट माझ्या बाबांना माहिती होती पण बाबांनी मला लग्नाआधी सांगितली नव्हती. हा दुसरा धक्का. म्हणून कंटाळून कदाचित त्यांनी माझ्यासोबत लग्न केले असावे असे वाटत होते.
मला त्यांनी(पती) ह्या गोष्टी स्पष्ट सांगितल्या. मग मी त्यांना विचारले “मग आता काय करायचे??” “आता आहे तसे निभवायचे.” समोरच्यांनी आपल्या सोबत चांगले केले नसेल तरी आपण समोरच्या सोबत चांगलेच वागायचे ह्या पद्धती प्रमाणे आपण राहायचे हेच ठरवले होते.. कारण तिथे संस्कार मधे यायचे.
     लग्नाच्या दोन-तिन दिवसातच अनपेक्षित असलेल्या गोष्टीचा उलगडा झाला. पण समोर तरी वेवस्थीत होईल असे वाटत होते... पण कसे होणार???

No comments:

Post a Comment