Friday, August 2, 2019

उच्चशिक्षितांची हुंडा पध्दत.....

     काही दिवसानंतर लग्नाच्या आधीचे कार्यक्रम सुरु झाले होते. मुलाच्या घरापर्यंत येण्याचा कार्यक्रम झाला. मग मला मुलाकडचे पहायला आले. मला फक्त मुलाची जन्मतारीख माहिती होती. पण प्रत्यक्षात जेव्हा मी त्या मुलाला पाहले तेव्हा खरच तो वयाने खुप मोठा वाटत होता. पण मनात ठरवले होते. बाबा ज्या मुलाबरोबर लग्न ठरवतील ते मला स्वीकार आहे. कारण बाबांना बोलायची माझी हिम्मत होत नव्हती. मुलाकडचे ऐवून गेले. काही दिवसात होकार आला. मग पुन्हा देण्याघेण्याच्या गोष्टी सुरु झाल्या.
     आजच्या जमान्यात, ते पण उच्चशिक्षित लोक सुध्दा हुंडा पद्धतीत अजून मागे नाही आलेत. हुंडयाची मागणी झाली. आई-वडिलांना तर मुलींच्या लग्नासाठी सर्व काही करावच लागते. मुलांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यात. आम्हा दोघांचे (मुलगा व मुलगी)  बरोबरीचे होते. व आम्ही दोघे पण जॉब करत होतो तरीही हुंडयाची मागणी घातली. मला ही गोष्ट खुप खटकली. पण काय करणार बाबांन समोर काही बोलता येत नव्हते. बाबांना मुलांकडच्या सर्व अटी मान्य केल्यात...

मला हुंडा घेणाऱ्यांनाची अजूनही खुप चीड येते..

“अस नाही वाटत का कुणाला?” जे मुला वाले लग्नासाठी हुंडा मागतात ते स्वत: काही करुन दाखवण्यासाठी प्रात्र नसतात. हुंडा मागुन ते लोक सिध्द करुन दाखवतात  कि “ते पैसे घेऊन सुध्दा जबाबदारी स्विकारु शकनार नाही.” 

No comments:

Post a Comment