बरेच दिवस गेलेत तरीही आमचे(माझे व ह्यांचे) एकमेकांशी
अजून फोनवर बोलणे नव्हते. माझ्या मनात विचारांचा
गोंधळ होत होता. अस्वस्थ्ा वाटत होते. बाबा त्या मुला बद्दल खुप चांगल्या गोष्टी सांगायचे
”मुल खुन चांगली आहेत, आईच्या बोलण्यासमारे जात नाहीत, आई जे म्हणेल तेच खरे अशी ती
मुल आहेत.” हे एैकून माझ्या मनात अजूनच गोंधळ
होत होता.. “आईच्या धाका मुळे तर त्यांनी मला होकार दिला नसेल ना?”, “ऐवढे दिवस झाले
तरी त्यांनी एक फोन सुध्दा नाही केला??”..
असे ना ना त-हेचे प्रश्न माझ्या समोर
उपस्थीत होत होते. मला त्यांना(मुलाला) बोलल्याशिवाय राहावतच नव्हते. लग्नाची तारीख
जशी जशी जवळ येत होती तशी तशी बेचैन वाढत होती.
असे प्रश्न उपस्थित होत होते कि, त्यांनी त्यांच्या
मना विरुद्धतर तर लग्न नाही करत आहेत??
ऐके दिवशी हिम्मत केली व त्यांना कॉल केला त्या
दिवशी Republic Day होता. Wish करण्याच्या कारणाने त्यांना फोन केला. तेव्हा त्यांना wish करुन सरळ
एक प्रश्न विचारला “तुम्ही स्वत: होऊन फोन करणार नव्हते वाटते?” तर त्यांनी सरळ “ हो ” म्हटले व त्यावरुन अजून म्हटले, “लग्नापर्यंत तुझ्यासोबत फोन वर बोलायचे नाही असे ठरवले होत मी.”
तेव्हा त्यांचे थोडे अश्चर्यच वाटले. आजकालचे
मुल कसे आणि हे तर त्यापेक्षा वेगळेच आहेत. मनात गोंधळ वाढत गेला. एक वेळ बोलणे
झाले तेवढे समाधान वाटले मला. त्यानंतर दुसरी वेळ म्हणजे जेव्हा मी माझी PET(P.hd
Entrance Test) exam पास झाली ह्याबद्दल त्यांना कळवले. जेव्हा कळवले तेव्हा त्यांना
खुप आनंद झाला. त्यांनी त्यांच्या घरच्यांना व नातेवाईकांना पण सांगितले माझ्या PET
result बद्दल. मला व माझ्या घरच्यांना पण खुप आनंद झाला पण माझ्या घरच्यांना PET
result पेक्षा जास्त माझे लग्न जुळले याच्यातच झाले होते. मला माझे नशीब खुप बदलेल
असे दिसत होते.
पण लग्नानंतर माहिती पडले त्या PET बद्दल कुणालाही काही वाटले नाही हे आज मला
सामजले. साहजीच लग्ना आधी आम्ही फोन वर दोन ते तिन वेळ बोललो असेल.
No comments:
Post a Comment