"अन्न हे परब्रम्ह
" असे
म्हणतात पण इथे मात्र वेगळेच. मागील ६ वर्षात असे
कधीच झाले नसेल कि आमच्या घरचे सकाळ असो वा संध्याकाळ असो जेवताना त्या अन्नाला काहीतरी नावबोट ठेवायचे म्हणजे ठेवायचे. "ती भाजी पानचटच झाली,खारटच झाली,मग तिखटच कमी झाले, मसाला कमी झाला,तेल जास्त झाले,भाजी जळाली". ती भाजी,चपात्या असो की मग नास्त्याचे असो त्याला नाव ठेवायचे म्हणजे ठेवायचे आणि प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या सर्वांकडेच असते असे आवडी निवडी.
सकाळ उठल्यापासून मला टोकणे सूरु होत होते, त्यात प्रत्येकाची ऑर्डर वेगवेगळी असे आणि सर्वांची वेळ पण वेगवेगळी
असत. "तु चहात साखरच टाकली नाही वाटते, तुझा चहा पानचट होते" असे ना ना तऱ्हेचे बोलणे मला रोज ऐकावे लागत असे. ह्या जगात परफेक्ट असे कुणीच नव्हते. नवीन
नवीन असताना कधी कधी मग "तु आज हे बनव, मला आज ते खाव वाटत आहे" मी
घरचे जे म्हटले ते बनवून द्यायची पण त्यांचे बोलणेच असे असायचे कि भितीपाई माझे बिगडून जायचे. मला स्वयंपाकाची आवड आहे आणि वेगवेगळे पदार्थ बनवायला पण आवडते. आता मात्र ती आवड कमी केली. जसे एखाद्या गोष्टीसाठी कुणाला प्रोत्साहन केले तर समोरच्याला
पुन्हा काही करण्यात आवड निर्माण होते पण इथे मात्र समोरच्याला बोलून बोलून मागे खेचले जाते. माझी कोंडी वाढतच जायची. सुरवातीला
मी निमुटपणे सर्व सहन केले.